कौशल्य विकासाची गरज

दिनांक: १२ डिसेंबर, २०१७

बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात श्री. रवींद्र नाईक यांचे ‘ मुलांचा कौशल्य विकास कसा साधाल ?’ या विषयावर व्याख्यान झाले.मुलांना soft skills व life skills देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.व्यक्तीची वेगाने प्रगती होण्यासाठी , आपण शिकलेल्या गोष्टींचा जीवनात उपयोग करता यायला हवा. मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी त्यांना सारखे शिकविण्या ऐवजी त्यांना  विकासासाठी space देणे महत्वाचे असते.”असेही ते म्हणाले.’स्मार्ट champs’ या आपल्या संस्थेद्वारे श्री. नाईक मुलांच्या कौशल्य विकासाचे काम करतात.त्यात मुलांमध्ये आतून प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

” मुलांना भविष्यकाळासाठी तयार करायचे असेल तर ती लवचिक हवीत. अनेक गोष्टी एका वेळी करण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी हवे. चांगली संभाषण कौशल्य , वाटाघाटींची कौशल्य . बरोबर काय आणि चूक काय ते कळण्याची क्षमता त्यांच्यात हवी.” असे श्री. नाईक यांनी पालकांना सांगितले.

बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या,” पालकांनी मुलांना वेगवेगळ्या गोष्टी करून पाहण्याची संधी दिली पाहिजे. त्यातून मुलांची बलस्थाने व त्यांच्या कमतरता पालकांच्या लक्षात येतील.मग कमतरता कमी करून बलस्थाने वाढविण्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे. त्यातूनच मुलांचा आत्मविश्वास वाढेल.” 

” परिस्थिती झपाट्याने बदलत आहे,त्यामुळे कधी नव्हे एवढी कौशल्य विकासाची गरज निर्माण झाली आहे ” असेही सौ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले. सौ. माधवी केसकर यांनी आभार प्रदर्शन केले.सुजाण पालक मंडळातील पालकांनी प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. यावेळी बहुविध बुद्धिमत्ता विकासनाला हातभार लावणाऱ्या खेळांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे सर्व खेळ मुले मनसोक्त खेळली.

श्री. रवींद्र नाईक व सौ. माधुरी सहस्रबुद्धे

श्री. रवींद्र नाईक व सौ. माधुरी सहस्रबुद्धे

श्री. व सौ नाईक व सौ. माधुरी सहस्रबुद्धे

श्री. व सौ नाईक व सौ. माधुरी सहस्रबुद्धे

माधुरी सहस्रबुद्धे व मुले स्मार्ट चाम्प च्या खेळण्या समवेत

माधुरी सहस्रबुद्धे व मुले स्मार्ट चाम्प च्या खेळण्या समवेत