बास्केट बॉल कोर्टचे उद्घाटन

दिनांक: २६ मे, २०१७

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राच्या , नुतनीकरण केलेल्या बास्केट बॉल कोर्टाचे उद्घाटन श्री. अमृत पुरंदरे यांच्या हस्ते झाले. 

” २० वर्षांपूर्वी बालरंजन केंद्रात बास्केट बॉल विभाग सुरु झाला. तेव्हा मातीच्या मैदानाबरोबरच कोन्क्रीटचे मैदानही तयार करण्यात आले. आता २० वर्षांनंतर त्याचे नुतनीकरण, फेरोक्रीट तंत्रज्ञानाने करण्यात आले आहे. येथे अनेक खेळाडू तयार झाले तसेच मोठ्या संख्येने मुलांनी आपली तंदुरुस्ती टिकवली. टी.व्ही. मोबाईल, कोम्पुटर या पासून दूर राहून मुले खेळती झाली. हे आपल्या उपक्रमाचे वैशिष्ठ्य आहे”, संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या.  

 श्री. अमृत पुरंदरे म्हणाले,” सामना जिंकणे हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मुलांनी खेळले पाहिजे. भैरवी घाटे व मनीषा ओक यांनी ‘ मुले घडविणे ‘ हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन कोचिंग केले आहे तसेच विलोभ हुलगे व योगेश हुलगे हे हि मनापासून कष्ट घेत आहेत त्याचा मुलांना फायदा होत आहे. डॉ. प्र.चिं.शेजवलकर म्हणाले,” पुणे शहरात असे भरगच्च कार्यक्रम करणारी बालरंजन केंद्र ही एक उल्लेखनीय संस्था आहे.”  तसेच बास्केटबॉल विभागाच्या पुढील वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या.  यावेळी श्री. जयंत आगाशे, प्रा. फडके, श्री नातू व श्री. पुष्यमित्र दिवेकर उपस्थित होते.   

बास्केट बॉल कोर्टचे उद्घाटन

बास्केट बॉल कोर्टचे उद्घाटन