बालरंजन केंद्राचे ३० व्या वर्षात पदार्पण !

भारती निवास सोसायटीचा उल्लेखनीय उपक्रम असलेल्या बालरंजन केंद्राने आपली २९ वर्षांची वाटचाल पूर्ण करीत ३० व्या वर्षात पदार्पण केले. ह्यावेळी भूगोलतज्ञ डॉ. सुरेश गरसोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ३ ते १६ वर्षाच्या साडेतीनशे मुलांनी विविध खेळांची चित्तवेधक प्रात्याक्षिके सादर केली. मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांच्या टाळ्यांनी बालरंजनचे मैदान दणाणून गेले. छोट्या मुलांनी रिंगामधून उड्या मारल्या, बोगद्यातून मुले रांगली. मार्करच्या बाजूने झिग-झॅग पळाली, हर्डल्स वरून उद्या मारल्या. नवीन प्रकारे टिक-टॅक-टो हा खेळ खेळली. रंगीबेरंगी पॅराशुटचा खेळ उपस्थितांना फारच भावला. त्यातून उडवलेले रंगीत चेंडू अतिशय मनोहर दिसले. 

बास्केट बॉल गटातील मुलांची उत्तम तयारीनिशी सादर केलेल्या ड्रिबलिंग व फुटवर्कच्या लयबद्ध प्रात्यक्षिकांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

डॉ. सुरेश गरसोळे यांनी यावेळी बालरंजन केंद्राला महाराष्ट्राचा नकाशा तसेच  अॅटलास भेट दिला. त्याद्वारे नवीन गावे शोधा, त्यांची माहिती मिळवा आणि आपले जग विस्तारा असे आवाहन केले. “पर्यावरणाचे मित्र व्हा ! प्रदुषणाचे शत्रू व्हा !!” असा नारा त्यांनी दिला. माधुरीताईंचे हे कार्य उत्तम असून त्यांनी ते महाराष्ट्रभर पसरवावे अशी अपेक्षा डॉ. गरसोळे यांनी व्यक्त केली. 

बालरंजन केंद्राच्या संस्थापिका-संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्रातील मुलांच्या मनात बालरंजन ने ‘आनंदाचे ठिकाण’ असे स्थान पटकावले आहे. आनंदी बालपण हा मुलांचा हक्क असून त्यांना तो मिळवून देणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे ” असे सांगितले . 

डॉ.शेजवलकर यांनी, “इथे येणारी मुले भाग्यवान आहेत. माधुरीताईंच्या मार्गदर्शनाखाली ‘टीम बालरंजन’ बालकांसाठी तळमळीने काम करीत आहेत. त्यातून मुलांची प्रगती होताना पाहून समाधान वाटते “असे सांगितले. सौ. मंजिरी पेठे यांनी सूत्रसंचालन केले. 

यावेळी डॉ. श्यामला वनारसे, श्रीमती. सिंधुताई अंबिके, श्रीमती रजनी दाते, शोभा भागवत, विदुला म्हैसकर, श्री. जयंत व सौ. गीता दुवेदी आदि बालकारणी उपस्थित होते. 

बालरंजन केंद्राचे ३० व्या वर्षात पदार्पण       बालरंजन केंद्राचे ३० व्या वर्षात पदार्पण बालरंजन केंद्राचे ३० व्या वर्षात पदार्पण       बालरंजन केंद्राचे ३० व्या वर्षात पदार्पण बालरंजन केंद्राचे ३० व्या वर्षात पदार्पण