कमान शिल्प

दिनांक: १ जानेवारी, २०१७ 
 
नगरसेविका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून कमला नेहरू उद्यानात एक नवीन आकर्षण निर्माण झाले आहे.
कुंड्यांपासून बनविलेले एक ‘कमान शिल्प’ बागेच्या सौंदर्यात भर घालत आहे. पुणे शहरातील उद्यानांत अशा प्रकारचे हे पहिलेच शिल्प आहे. त्याचे उत्घाटन उद्यानात नियमितपणे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मीराताई रानडे यांनी, संत तुकारामांचा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा अभंग गाऊन प्रातःकाळचे वातावरण प्रसन्न केले.
 
” भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या बागेचे उत्घाटन झालेले आहे. अत्यंत मोक्याच्या जागी असलेले हे चार एकराचे उद्यान प्रभागातील नागरिकांसाठी आनंदाचे ठिकाण आहे. येथे मी केलेली ‘कवितेची बाग’, ‘शिशु क्रीडांगण’, ‘साहित्यिक कट्टा’ यापाठोपाठ उभारलेले ‘कमान शिल्प’ बागेचे आकर्षण ठरेल यात शंका नाही.” असे उद्गार नगरसेविका सौ.सहस्रबुद्धे यांनी उत्घाटन प्रसंगी काढले.
 
शिल्पकार श्री.राजेंद्र थोपटे, म.न.पा.चे अधिकारी श्री.जे.बी.पवार व श्री.तुमाले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्याम भुर्के यांनी केले तर श्री.प्रकाश भोंडे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
 
कमला नेहरू उद्यानात कमान शिल्प

कमला नेहरू उद्यानात कमान शिल्प

 

कमला नेहरू उद्यानात कमान शिल्प

कमला नेहरू उद्यानात कमान शिल्प