दिनांक: २८ नोव्हेंबर, २०१७
बालरंजन केंद्राची कुठलीही ताई, देशात व परदेशात सहलीला गेली कि तिला सतत आठवण येते बालरंजन केंद्रातल्या मुलांची. मग ताई तेथील मुलांच्या आवडीच्या गोष्टी आपल्या कॅॅमेऱ्यात बंदिस्त करतात आणि इकडे आल्यावर मुलांपुढे तो खजिना रिकामा करतात. आशा होनवाड या ताईने नुकतीच सिंगापूर-मलेशियाची ट्रीप केली. तेथील फोटो व व्हिडीओजचे सादरीकरण तिने मुलांसाठी केले.
उंचच उंच twin tower, बाटु केव्ह्स मधील कार्तिकेयाचा पुतळा, strawberry garden, lavender garden मुलांनी पहिल्या.
पेनांग येथील निसर्गरम्य वातावरणातील बुद्धांची मंदिरे प्रेक्षणीय होती.
लंकावी बेटावरील गरुडाच्या भव्य पुतळ्याने मुलांचे लक्ष खिळवून ठेवले.तेथील काळी व पांढरी वाळू ,निळेशार पाणी ,गडद निळे डोंगर हे निसर्गसौंदर्य मुलांनी डोळे भरून पाहिले.
सिंगापूरच्या सेन्टोसा आयलंडने मुलांना वेड लावले.तिथला लाईट व साऊंड शो, प्रचंड मोठे मत्स्यालय, wax museum चे फोटो मुलांना भावले.तर Jurrong Bird Park मधील पक्षांच्या रंजक व्हिडीओजने कार्यक्रमाची सांगता झाली.
बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी आशाताईंचे आभार मानले.संपूर्ण सहलीतील, मुलांना आवडतील अशा गोष्टी नेमकेपणाने निवडून त्यांना सिंगापूर- मलेशियाची अतिशय सुंदर सफर आशा ताईंनी घडविल्याचे माधुरी ताईंनी यावेळी सांगितले.