आगळा वेगळा नाट्य प्रयोग

दिनांक: २७ सप्टेंबर, २०१६

श्री प्रसाद वनारसे दिग्दर्शित, ‘ The Balancing Act’ या नाटकाने बालरंजन केंद्रात धमाल उडवून दिली. पाच विदुषकांनी सादर केलेल्या या नाटकातील प्रसंगांनी भाषा नसताना देखील मुलांच्या मनात प्रवेश केला.

खूप सारी उर्जा, लयबद्ध हालचाली व उत्फुर्तता हे नाटकाचे गुणविशेष होते. मुले नाटकात मनस्वी गुंगून गेली. छोट्यानबरोबरच मोठ्यांनी नाटकाचा आनंद घेतला.

विविध नाट्यप्रकार मुलांना अनुभ्य्ता यावेत यासाठी या नाटकाचे आयोजन करण्यात आल्याचे बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमास डॉ. श्यामला वनारसे, श्री प्रशांत कोठडिया, उज्वला मेहेंदळे, विद्या पटवर्धन, ज्योत्स्ना केतकर व विद्या भागवत आदी मान्यवर उपास्थित होते.

आगळा वेगळा नाट्य प्रयोग

The Balancing Act – आगळा वेगळा नाट्य प्रयोग

 

आगळा वेगळा नाट्य प्रयोग

आगळा वेगळा नाट्य प्रयोग – आनंद घेताना मुले