विवेकानंदांचे विचार पालकांसाठी प्रेरणादायी

दिनांक: १३ जानेवारी, २०१६

बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात स्वामी विवेकानंदांच्या १५२ व्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .

प्रा .डॉ .आशिष पुराणिक यांनी ‘विवेकानंदांचे शिक्षण विषयक विचार’ या विषयावर मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले. विवेकानंदांचे शिक्षणाच्या बाबतीतले विचार हे प्रामुख्याने त्यांच्या पत्रव्यवहारात पहावयास मिळतात असे ते म्हणाले. आज मुलांना पालकांनी राष्ट्रप्रेम शिकविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. देशप्रेम हे त्यागातून येते. “माझ्या मुलांना नियम पाळण्यात शूरपणा वाटतो कि नियम मोडण्यात वाटतो ? हे पालकांनी तपासून पहावे. आपली मुले सद्विचारापासून दूर जात नाहीयेत ना? याबाबत पालकांनी दक्ष रहावे”, असेही ते म्हणाले.

“मुलांना सुरक्षित वाटणे हे प्रत्येक मुलासाठी महत्वाचे आहे ” हे स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या काळातही लागू आहेत असे संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले व सोप्या भाषेत विवेकानंदांचे विचार उपस्थितांपर्यंत पोचविल्याबद्दल श्री .पुराणीकांचे अभिनंदन केले. सौ.लता दामले यांनी आभारप्रदर्शन केले.

प्रा .डॉ .आशिष पुराणिक बालरंजन केंद्रात पालकांना मार्गदर्शन करताना

प्रा .डॉ .आशिष पुराणिक बालरंजन केंद्रात पालकांना मार्गदर्शन करताना