छोट्यांसाठी कथाकथन

दिनांक: १० सप्टेंबर, २०१६

छोट्या दोस्तांना गोष्ट ऐकायला फारच आवडते. भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रथम बुक्स च्या संपादिका संध्या टाकसाळे यांनी मुलांना ‘ह्त्तीपक्षी आणि मुनिया’ हि कथा सांगितली. अधानिया या छोट्याशा गावात राहणारी चिमुकली मुलगी मुनिया आणि हत्ती एवढा महाकाय पक्षी यांच्यातील मैत्रीची ही गोष्ट मुलांना खूप आवडली. संध्याताईनी बच्चेकंपनीला गोष्टीत सहभागी करून घेत ती पुढे नेली. प्रेमळ आणि शूर मुनिया मुलांना भावली.

“हीच गोष्ट आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने देशभरात २१ भाषांमध्ये ३००० ठिकाणी सांगितली गेली. त्यापैकी एक बालरंजन केंद्र होते “असे माधुरी ताईंनी यावेळी नमूद केले. वर्षा बरिदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ठोकळ प्रकाशनचे श्री.सुजय ठोकळ उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मुले व पालकांनी आपल्या आवडीच्या गोष्टींच्या पुस्तकांची मनसोक्त खरेदी केली .

बालरंजन-केंद्रात-कथाकथन-करताना-संध्या-टाकसाळे

बालरंजन-केंद्रात-कथाकथन-करताना-संध्या-टाकसाळे

बालरंजन-केंद्रात-कथाकथन-करताना-संध्या-टाकसाळे

बालरंजन-केंद्रात-कथाकथन-करताना-संध्या-टाकसाळे