प्राधान्यक्रमांचे व्यवस्थापन !

दिनांक: २० सप्टेंबर, २०१६

‘प्राधान्यक्रमांचे व्यवस्थापन’ ह्या आगळ्यावेगळ्या विषयावर बालरंजन केंद्रात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

“वेळेचे व्यवस्थापन आपल्याला परिचित आहे पण प्रायोरिटी मानेजमेंट ही नवी संकल्पना आहे. व्यक्तीचे प्राधान्यक्रम हे वैयक्तिक, व्यावसायिक किंवा उद्दिष्टांशी संबंधित असतात. कुणाला कॉम्पुटर शिकायचं, कुणाला पुस्तके वाचायची आहेत, कुणाला पुस्तक लिहायचे आहे तर कुणाला जगभर हिंडायचे आहे – एक ना दोन ! आपण ठरविलेल्या सर्व गोष्टी आपण पुऱ्या करू शकत नाही. त्यामुळे खरे प्राधान्यक्रम ओळखून त्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे” असे शिबिराचे मार्गदर्शक श्री.कपिल अपशंकर यांनी मुले व पालकांना सांगितले. श्री.अपशंकर हे व्यवस्थापन तज्ञ आहेत व त्यांचे याच विषयावरील ‘done’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले असून ते amazon वर ‘बेस्टसेलर’ पुस्तक ठरले आहे.

“आपले २५ प्राधान्यक्रम लिहून काढावेत नंतर त्यापैकी अगदी महत्वाचे, अर्थात आपल्या दृष्टीने असे ५ निवडावेत. उरलेल्या २० गोष्टींवर फुली मारावी. मग फक्त तेवढ्याच बाबींवर लक्ष केंद्रित करून रोजच्या दिनक्रमात त्यासाठी आवर्जून १५ मिनिटे काढावीत. अशाप्रकारे स्वतःवर काम केल्यास दीर्घकालीन व दैनंदिन प्राधान्यकर्म हळूहळू एकरूप होऊ लागतील आणि आपली उद्दिष्टे साध्य होतील” असे ते पुढे म्हणाले.

“मुलांना लहानपणीच आपले प्राधान्यक्रम ठरवता आले तर ती आयुष्यात मोठा पल्ला गाठू शकतील” असा विश्वास बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केला. त्यानंतर प्रश्नोत्तरे झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा बरिदे यांनी केले तर सौ.सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.

कपिल अपशंकर आणि सौ. माधुरी सहस्रबुद्धे

कपिल अपशंकर आणि सौ. माधुरी सहस्रबुद्धे

 

Kapil Apshankar conducting Priority Management Workshop

Kapil Apshankar conducting Priority Management Workshop

 

Kapil Apshankar on Priority Management

Kapil Apshankar on Priority Management