बालरंजन चा नाट्यवर्ग रौप्यमहोत्सव

दिनांक: ७ फेब्रुवारी, २०१६

भारती निवास सोसायटीच्या, बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाच्या रौप्य महोत्सवाचा सांगता समारंभ नुकताच पार पडला . दिग्दर्शक योगेश जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .त्यांच्या हस्ते बालकलाकारांचा गौरव करण्यात आला .” नाईट आउट ” व ‘चित्र रंगले ” हि दोन धमाल बालनाट्ये यावेळी सादर करण्यात आली .

केंद्राच्या संचालिका व नगरसेविका सौ माधुरी सहस्रबुद्धे यांनी २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला .” सुरुवातीची ४ वर्षे केंद्राने फक्त नाट्य प्रशिक्षण दिले . त्यानंतर गेली २१ वर्ष विविध स्पर्धात सहभागी होऊन आजवर खूप सारी बक्षिसे मिळवली . ballet , परिसर रंगभूमी , पथनाट्य , नृत्य स्पर्धेत पालक गटाने मिळवलेली बक्षिसे तसेच युद्ध , घर , मित्र ह्या थीम वर केलेली सादरीकरणे यामुळे मुलांबरोबर आम्हीही समृद्ध झालो ” असे उद्गार सौ सहस्रबुद्धे यांनी काढले .

 ‘ बालरंजन केंद्र हि संस्था मुलांसाठी निर्व्याज व निरपेक्षपणे काम करीत आहे . इथे मुलांच्या भावविश्वाचा खोलवर विचार केला जातो ही आशादायी गोष्ट असल्याचे ‘ मत दिग्दर्शक योगेश जाधव म्हणाले .’ सिनेमा आणि नाटक या माध्यमातून मुलांना संदेश मिळतो , तो मुलांवर खूप परिणाम करतो.  नाटकाच्या विषयांची निवड करताना याचे भान ठेवावे लागते . हे भान राखून बालरंजन ने विविध विषय आजवर हाताळले आहेत ते कौतुकास्पद आहे ‘

मार्गदर्शक श्री . देवेंद्र भिडे व रेणुका भिडे यांचा योगेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नात्य्वर्गाचे  माजी विद्यार्थी  मोठ्या आपुलकीने उपस्थित होते. सुमनताई शिरवटकर  यांचा संस्थेशी असलेल्या दीर्घकालच्या ऋणानुबंधा बद्दल सत्कार करण्यात आला . प्रज्ञा गोवईकर यांनी अहवाल वाचन केले . दीप्ती कौलगुड यांनी आभार मानले .

चित्र रंगले नाटकातील बाल कलाकारांसमवेत श्री. योगेश जाधव व संचालिका सौ माधुरी सहस्रबुद्धे

चित्र रंगले नाटकातील बाल कलाकारांसमवेत श्री. योगेश जाधव व संचालिका सौ माधुरी सहस्रबुद्धे