वाद्यांची ओळख – क्रमांक ९ – मंगलमय सूर निनादले

दिनांक: २१ ऑक्टोबर, २०१६

भारती निवास सोसायटीच्या सहकार सदन मध्ये दिवाळीपूर्वीच सनईचे मंगल सूर निनादले . निमित्त होते कार्यक्रम वाद्यांची ओळख भाग ९ वा – सनई -सुंद्री .सनईवादक कुटुंबात जन्माला आलेले आणि ‘ सनई ‘ विषयात डॉक्तरेट प्राप्त केलेले  श्री .प्रमोद गायकवाड यांनी या वादयाची माहिती बालरंजन केंद्रातील मुलांना दिली .अशाप्रकारे बालरंजनची दिवाळी आजच सुरु झाली .त्यांच्याबरोबर त्यांची कन्या नम्रता गायकवाड हिने आपल्या वादनाने उपस्थितांची मने जिंकली .नम्रता हिला गेल्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवात वादन करायची संधी मिळाली होती . मैफिलीत सनई वादन करणारी ती पहिली महिला आहे .

‘सनई हे सुशीर वाद्य असून धार्मिक कार्यक्रमात तिला मान आहे .मांगल्याचे प्रतिक असलेल्या सनईने मंदिरात देवाला जागे करतात . तिचे चार भाग असतात . रीड म्हणजे सनईचे हृद्य .याखेरीज लोखंडी ट्यूब ,लाकडाचा मुख्य भाग , कर्ण्यासारखा भाग हे तिचे भाग असून सात छिद्रे असतात.सहा बोटे बंद करून ती वाजवतात.तिची लांबी १६ इंच असते .बनारसी सनई व महाराष्ट्रीय सनई असेही दोन प्रकार आहेत .हे अस्सल भारतीय वाद्य आहे ‘  असे श्री . गायकवाड यांनी सांगितले .

 नम्रताने सनईवर शुद्ध व कोमल स्वर लावले .त्यानंतर त्या दोघांनी ‘रामचंद्र कृपाल भज मन ‘हे भजन मग राग’ मालकंस’ वाजविला .ओंकार स्वरूपा हे गाणे मुलांनी ओळखले .सनई वर वाजवलेल्या ‘ नाच रे मोरा ‘ गाण्यावर मुले नाचू लागली .सीमा अंबिके यांनी प्रास्ताविक केले. बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांनी पाहुण्यांचे सत्कार केले . पहिली महिला सनई  वादक नम्रताला भावी वाटचाली साठी शुभेच्छा देऊन , सार्यांचे आभार मानले .

डॉ. प्रमोद गायकवाड व नम्रता गायकवाड बालरंजन केंद्रात सनई वादन करताना

डॉ. प्रमोद गायकवाड व नम्रता गायकवाड बालरंजन केंद्रात सनई वादन करताना