वाद्यांची ओळख – क्रमांक ८ (ओळख व्हायोलीनची)

दिनांक: २८ सप्टेंबर, २०१६

श्री.तेजस उपाध्ये यांनी , बालरंजन केंद्रातील मुलांना व्हायोलीन या वाद्याची ओळख करून दिली . उपाध्ये घराण्यातील  तेजस हा तिसर्या पिढीतील कलाकार आहे .आजोबा व वडील ( श्री. अतुलकुमार ) यांच्या पावलावर पाऊल ठेवीत सोळा वर्षांच्या शिक्षणा नंतर त्यांनी या वाद्यावर प्रभुत्व मिळविले आहे .त्यांनी अतिशय सोप्या भाषेत मुलांशी संवाद साधला . ‘व्हायोलीन ‘ या वाद्याला ‘ वाद्यांचा राजा’ म्हटले जाते . हे तसे शिकायला अवघड वाद्य आहे असे सांगितले .राष्ट्रगीताने सुरु झालेली हि मैफल ‘ रघुपती राघव राजाराम ‘ या भजनाने समाप्त झाली. तेजस यांनी ” जाने कहां गये वो दिन ” ,’एक प्यार का नगमा है ‘ ,तुम हि हो ‘, रोजा जानेमन ‘ सारखी सदाबहार गीते वाजविली . तर त्यांचा शिष्य अमन वरखेडकर याने ” अकेले अकेले कहां जा रहे हो ‘,कही दीप जले कही दिल ” हि गाणी वाजवून उपस्थितांची वाहवा मिळविली . बालरंजन चा विद्यार्थी अनय ने ‘ हापि बर्थ डे ” ची धून वाजविली .

तेजस दादांनी मुलांना व्हायोलीन चे सर्व भाग दाखविले. चीन रेस्ट , ब्रिज , फिंगर बोर्ड , मेजर ट्युनर , मायनर ट्युनर ,साउंड होल , बाक ,नेक हे सगळे पार्ट मुलांना पाठ  झाले. त्यानंतर त्याने तीन ताल शिकविला आणि टाळ्या वाजवून त्यांच्या कडून बोल म्हणून घेतले . यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली . “सर्व मान्यवर कलाकारांच्या सादरीकरणामुळे वाद्यांची ओळख चा हा आठवा भागही उत्तम प्रकारे संपन्न झाला . हि मुले मोठी झाली कि त्यांना आत्ता सादरीकरण करीत असलेल्या कलाकारांचे मोल कळेल आणि आपल्याच भाग्याचा हेवा वाटेल .” असे उद्गार बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी याप्रसंगी काढले .सौ . वर्षा बरिदे यांनी आभार मानले .

व्हायोलीन-ची-माहिती-सांगताना-श्री.-तेजस-उपाध्ये-व-श्री.-अमन-वरखेडकर

व्हायोलीन-ची-माहिती-सांगताना-श्री.-तेजस-उपाध्ये-व-श्री.-अमन-वरखेडकर

व्हायोलीनवर-राष्ट्रगीत-सदर-करताना-श्री.-तेजस-उपाध्ये

व्हायोलीनवर-राष्ट्रगीत-सदर-करताना-श्री.-तेजस-उपाध्ये