वाद्यांची ओळख – क्रमांक ६ (Synthesizer or Keyboard)

दिनांक: २६ जुलै, २०१६

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात सुषमा लाटकर यांनी मुलांना सिंथेसायझर या वाद्याची ओळख करून दिली .या वाद्यात ४८० प्रकारचे  आवाज काढता येतात . पाऊस , हेलीकोपटर ,विजांचा कडकडाट , फोन ची रिंग , पक्षांचे आवाज तसेच हसणे व रडण्याचे आवाज त्यांनी सिंथेसायझरवर काढून दाखविले .हापिबर्थडे ट्यून , ससा रे ससा न कापूस जसा ही गाणी मुलांना भावली .यानंतर त्यांच्या चार विद्यार्थ्यांनी वेगवेगळी हिंदी सिनेगीते वाजविली .सुषमा लाटकर यांनी सांगितले ,’ह्यात जवळजवळ सगळी वाद्ये वाजविता येतात .यावर शास्त्रीय संगीत , पोवाडे , लावणी सगळे प्रकार वाजविता येतात . हे दोन्ही हातानी वाजविले जाते . त्यामुळे मुलांच्या दोन्ही मेंदूंचे उत्तम समायोजन होते.’

संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . त्या म्हणाल्या ,’ बालरंजन केंद्राचा वाद्यांची ओळख हा उपक्रम आता चांगलाच मूळ धरू लागला आहे . आजचे ६ वे पुष्प आहे . मुले दर महिन्यात आता पुढच्या वाद्याची आतुरतेने वाट पहात असतात. “

माधुरी सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले . उमा उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रज्ञा गोवईकर यांनी आभार मानले . 

बालरंजन-केंद्रात-सिंथेसायझर-ची-ओळख

बालरंजन-केंद्रात-सिंथेसायझर-ची-ओळख

 

 डावीकडून-सुषमा-लाटकर-माधुरी-सहस्रबुद्धे-व-विद्यार्थी


डावीकडून-सुषमा-लाटकर-माधुरी-सहस्रबुद्धे-व-विद्यार्थी