वाद्यांची ओळख उपक्रमाची सांगता

दिनांक: १४ डिसेंबर, २०१६ 

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात यंदा वाद्यांची ओळख हा उपक्रम घेण्यात आला. त्यातील शेवटचे पुष्प आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक उस्ताद उस्मान खां साहेब यांनी गुंफले. त्यांनी मुलांना सतार या वाद्याची ओळख करून दिली. त्याबाबत बोलताना ते म्हणाले,” सतारीचा शोध १४ व्या शतकात लागला. सातारीमध्ये खाली भोपळा असतो व १८ ते २० तारांचा वापर केलेला असतो. हे वाद्य दोन्ही हाताने वाजवले जाते. उजव्या हाताने दारा वाजवतात तर डाव्या हाताने सूर वाजविले जातात. वेगवेगळे मूड दाखविण्यासाठी संगीतात सतारीचा वापर केला जातो”. खां साहेबांच्या दोन शिष्या मध्य्मी व गौरी यांनी मिश्रखमाज तसेच केरवा रागातील  धून वाजविल्या. त्यांची मलेशियन विद्यार्थिनी श्वेता हिने राग हंसध्वनीतील एक रचना वाजवली. कार्यक्रमाची सांगता त्यांच्या जेष्ठ शिष्या ज्या जोग यांच्या भैरवीने झाली. 

बालरंजन केंद्राच्या मुलांना दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या संग्रहातील डफ, ढोलक, कबास, तबला, सरोद, दिलरुबा, इसराज, बासरी, शेहेनाई, तंबोरा, पेटी, सारंगी, स्वरमंडल, व्हायोलीन, मंजिरा, खंजिरी व सतार इ. विविध वाद्यांचे प्रदर्शन भरविले होते. या वाद्यांविषयी माहिती रुखीया देशमुख यांनी मुलांना सांगितली. उस्मान खां यांनी अॅकलोंग नावाचे बांबू पासून बनवलेले इंडोनेशीयन वाद्य आठ मुलांकडून वाजवून घेतले. ह्याला मुलांनी भरभरून दाद दिली.

“उस्ताद उस्मान खां यांसारख्या दिग्गजांकडून मुलंना सतारीचे धडे मिळाले हे कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य होय. लहान वयात इतक्या महान व्यक्ती मुलांना भेटण्यामुळे मुलांचे भावविश्व समृद्ध होते” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका  सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. वर्षभर वाद्यांची ओळख हा कार्यक्रम यशस्वी झाला याबद्दल माधुरीताईंनी समाधान व्यक्त केले. सौ. आशा होनवाड यांनी आभार मानले.

मुलांकडून-अॅकलोंग-हे-वाद्य-वाजवून-घेताना-उस्ताद-उस्मान-खां-व-माधुरी-सहस्रबुद्धे

मुलांकडून-अॅकलोंग-हे-वाद्य-वाजवून-घेताना-उस्ताद-उस्मान-खां-व-माधुरी-सहस्रबुद्धे

 सतारवादन-करताना-मध्यमी-व-गौरी-व-खां-साहेब

सतारवादन-करताना-मध्यमी-व-गौरी-व-खां-साहेब