वाद्यांची ओळख – क्रमांक १ (बाजा – Mouth Organ)

दिनांक: १६ फेब्रुवारी, २०१६

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने यंदा वर्षभराच्या कार्यक्रमाची थीम ” वाद्यांची ओळख ” हि ठरवली आले .’ लहानपणापासूनच मुलांनी तंदुरुस्ती साठी एक खेळ व मन रमविण्यासाठी एक कला शिकावी

असे मला वाटते. छंद जोपासण्यासाठी आधी विविध गोष्टींचा मुलांना परिचय करून द्यावा लागतो . त्यासाठी अशा उपक्रमांची गरज असते .” असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. यातील पहिले पुष्प श्री . विजय बागुल यांनी गुंफले . ते  स्वतः निवृत्ती नंतर बाजा वाजवायला शिकले. आता हा आनंद इतरांना देत आहेत . ताल वाद्य व सूर वाद्य असे वाद्यांचे दोन प्रकार असतात . त्यापैकी माऔथ ऑर्गन हे सूर वाद्य आहे .ह्यात श्वास घेणे  व सोडणे योग्य वेळी करावे लागते असे ते म्हणाले.गाण्यातील शब्दांऐवजी नोटेशन्स वापरावी लागतात .

खास मुलांसाठी म्हणून त्यांनी माऊथ ऑर्गन वर बालगीते बसविली होती .चंदाराणी , किलबिल पक्षी बोलती , मानिमाऊचे बाळ यासारखी परिचित गीते श्री . बागुल वाजवीत असताना मुले ती  गाणी तोंडाने म्हणत होती .माऊथ ऑर्गन हे वाद्य मुलांना भावले . त्याच्या वादनाचा आनंद मुलांनी घेतला .कार्यक्रमाचे निवेदन सौ . वृषाली बागुल यांनी केले .

लता दामले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर ज्योती नूलकर यांनी आभार मानले .

श्री. विजय बागुल बाजा वाजविताना

श्री. विजय बागुल बाजा वाजविताना

श्री. विजय बागुल बाजा वाजविताना

श्री. विजय बागुल बाजा वाजविताना