अंतर्बाह्य सुंदरता (On the Occasion of Global Wellness Day)

दिनांक: १४ जून, २०१६

बालरंजन केंद्रातील मुले आणि पालकांसाठी ‘अंतर्बाह्य सुंदरता ‘ ह्या विषयावर सौंदर्यतज्ञ लीना खांडेकर यांचे व्याख्यान झाले . बाहेरून घरात आल्यावर मुलांनी हातपाय आणि चेहरा तसेच मान स्वच्च धुवावी .सकाळी व रात्री दात घासावे . रोज व्यायाम करावा . यामुळे शरीर चांगले राहील . सकारात्मक विचार , नात्यातील घट्ट वीण ,मैत्री आणि ध्यान यामुळे मन चांगले राहील . असे प्रतिपादन सौ . खांडेकर यांनी केले .जंक फूड ला ‘नाही ‘ म्हणायला मुलांनी शिकले पाहिजे असेही त्या म्हणाल्या . स्वत्छ् , निटनेटके रहाणे , पोश्चर चांगले ठेवणे महत्वाचे आहे . इतरांशी आदराने बोलणे आणि आत्मविश्वासपूर्वक वावर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंतर्बाह्य सुंदर करतील असे त्यांनी सांगितले .

‘आपल्या दृष्टीने जगातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आपणच असतो . त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायला शिकले पाहिजे ‘ असे भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी मुलांना सांगितले .दीपाली बोरा यांनी आभार प्रदर्शन केले .

अंतर्बाह्य-सुंदरता-या-कार्यक्रमात-लीना-खांडेकर-व-माधुरी-सहस्रबुद्धे

अंतर्बाह्य-सुंदरता-या-कार्यक्रमात-लीना-खांडेकर-व-माधुरी-सहस्रबुद्धे

सौंदर्य-तज्ञ-सौ.-लीना-खांडेकर-व-संचालिका-सौ.-माधुरी-सहस्रबुद्धे

सौंदर्य-तज्ञ-सौ.-लीना-खांडेकर-व-संचालिका-सौ.-माधुरी-सहस्रबुद्धे