‘मुलांमधील कौशल्य ओळखा.’

दिनांक: ३० जानेवारी, २०१६

बालरंजन केंद्राच्या २८व्या वर्धापन दिनानिमित्त ‘अंक’ (नंबर्स) ह्या संकल्पनेवरील गम्मत स्पर्धांचा बक्षीस समारंभ नुकताच संपन्न झाला.

सिम्बायोसिस ओपन एजुकेशन सोसायटीच्या प्रधान संचालिका डॉ.स्वाती मुजुमदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. मुले, आई गट, बाबा गट, आजी गट, आजोबा गट अशा सर्व गटातील विजेत्यांना गौरविण्यात आले.

“प्रत्येक मुल काहीनाकाही वेगळे कौशल्य घेऊन जन्माला येतं. मुलातील स्किल ओळखून त्याला प्रोत्साहन दिले तर मुलांच्या जीवनात आनंद फुलतो. आपल्या आवडीचे क्षेत्र मिळाले नाही तर आयुष्यात निराशा येते. त्यापेक्षा पालकांनी व शिक्षकांनी मुलांमधील उपजत कौशल्य ओळखून त्यांना वाव द्यावा. ह्याबाबतीत संचालिका माधुरीताई व बालरंजन केंद्रातील सर्व ताई करत असलेल्या कार्याचे मी कौतुक करते” असे याप्रसंगी बोलताना डॉ.स्वाती मुजुमदार म्हणाल्या.

“स्पर्धेचा ताण न येता, मुले व पालकांमधला खिलाडूपणा वाढावा यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या कल्पनांवरच्या गम्मत स्पर्धांचे आम्ही आयोजन करतो” असे संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

यावेळी डॉ.प्र.चिं.शेजवलकर उपस्थित होते. सौ.प्रज्ञा गोवईकर यांनी फोटोद्वारे केंद्राचा वार्षिक अहवाल सादर केला. सौ.लता दामले यांनी आभार मानले.

बालरंजन केंद्राची टीम संचालिका माधुरी सहस्रबुद्धे व डॉ.स्वाती मुजुमदार यांच्यासमवेत

बालरंजन केंद्राची टीम संचालिका माधुरी सहस्रबुद्धे व डॉ.स्वाती मुजुमदार यांच्यासमवेत

डावीकडून- डॉ.शेजवलकर, संचालिका माधुरी सहस्रबुद्धे, डॉ.स्वाती मुजुमदार, श्रीमती सुमन शिरवटकर

डावीकडून- डॉ.शेजवलकर, संचालिका माधुरी सहस्रबुद्धे, डॉ.स्वाती मुजुमदार, श्रीमती सुमन शिरवटकर