‘ईको – फ्रेंडली’ गणेशमूर्तींची कार्यशाळा!

दिनांक: ३१ ऑगस्ट, २०१६

भारती निवास सोसायटीच्या ‘बालरंजन केंद्रातर्फे’ आज ‘ईको-फ्रेंडली’ गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याला मुले व पालकांनी भरगोस प्रतिसाद दिला. शिल्पकार श्री.रवि घैसास यांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्यास शिकविले. मुलांशी गप्पा मारत, हसत-खेळत, सहा सोप्या टप्प्यातून ही मूर्ती घडविली.

मूर्ती बनविताना मात्र, प्रत्येक मुलाची मूर्ती ही वेगवेगळी घडली. सृजनशीलतेचा व स्वनिर्मितीचा आनंद यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता.

“आता ह्याच मूर्तींची मुले आपापल्या घरी प्रतिष्ठापना करणार असून, बालरंजन केंद्राच्या आवारातच त्याचे ‘पर्यावरण-पूरक’ विसर्जन करण्यात येईल. पारंपारिक चाली-रीतींमध्ये काळानुरूप बदल घडवून, निसर्ग-संवर्धनाचे संस्कार मुलांवर घडविण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे विशेषत्वाने आयोजन केले आहे” असे संचालिका सौ.सहस्रबुद्धे म्हणाल्या.

यावेळी, मुलांबरोबरच पालकांनीही ह्या उपक्रमात हिरीरीने भाग घेतला. त्यामुळे, पर्यावरण रक्षणाचा संदेश घरोघरी पोहोचला.

मुलांनी-बनविलेल्या-गणेशमूर्तींसह-माधुरीताई-व-बालचमू

मुलांनी-बनविलेल्या-गणेशमूर्तींसह-माधुरीताई-व-बालचमू

आजोबा-व-नात

आजोबा-व-नात

पालकांचाही-सहभाग

पालकांचाही-सहभाग

शिल्पकार-रवि-घैसास-व-संचालिका-माधुरी-सहस्रबुद्धे

शिल्पकार-रवि-घैसास-व-संचालिका-माधुरी-सहस्रबुद्धे

कार्यशाळेला-अभूतपूर्व-प्रतिसाद

कार्यशाळेला-अभूतपूर्व-प्रतिसाद

गणेशमूर्ती-बनविण्याचे-प्रात्यक्षिक

गणेशमूर्ती-बनविण्याचे-प्रात्यक्षिक

शिल्पकार-रवि-घैसास

शिल्पकार-रवि-घैसास