बालरंजन केंद्राच्या मुलांनी घेतली ‘न थुंकण्याची’ शपथ!

दिनांक: ७ एप्रिल, २०१६

“आपण सर्वजण आपले घर स्वच्छ ठेवतो. मात्र, सार्वजनिक ठिकाणच्या स्वछतेबाद्द्ल आपण बेपर्वाई दाखवतो. रस्त्यावर थुंकण्यामुळे रोगराई पसरते. त्यासाठी, आपण स्वतः न थुंकता, थुंकणाऱ्या लोकांना त्यापासून परावृत्त केले पाहिजे” असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी बालरंजन केंद्रातील मुलांना सांगितले.

आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही आहेत. सार्वजनिक ठिकाणी न थुंकल्यास देशातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहील असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘न थुंकण्याबद्दल’ मुलांनी जागृती करावी असे माधुरीताई याप्रसंगी म्हणाल्या.

यावेळी बालरंजन केंद्रातील मुलांनी ‘न थुंकण्याची’ शपथ घेतली.

बालरंजन केंद्रात 'anti-spitting' मोहिमेची शपथ देताना संचालिका माधुरी सहस्रबुद्धे

बालरंजन केंद्रात ‘anti-spitting’ मोहिमेची शपथ देताना संचालिका माधुरी सहस्रबुद्धे