दिनांक: १६ एप्रिल, २०१६
मुलांच्या उन्हाळी सुट्टीच्या सुरुवातीलाच कमला नेहरू पार्क येथे ज्येष्ठ ‘बालकारणी’ सौ.शोभा भागवत यांच्या हस्ते ‘शिशु-क्रीडांगणाचे’ उद्घाटन झाले.
५ वर्षाखालील मुलांसाठी वेगळी खेळणी असावीत अशी प्रभागातील पालकांची मागणी होती. त्यामुळे, ह्या चिमुकल्यांना मुक्तपणे खेळता यावे यासाठी स्वतंत्र शिशु-क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली आहे.” असे नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी माधुरीताईंनी मुलांना ‘सुट्टीची गाणी’ सांगितली.
सौ.शोभा भागवत यांनी मुलांना गोष्ट सांगून पालकांशीही संवाद साधला. यावेळी सौ.वृंदा देशपांडे, अमला भागवत, रेखा खाडिलकर व सुषमा दातार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, पुणे म.न.पा.चे उद्यान अधीक्षक श्री.अशोक घोरपडे, श्री.कांबळे, श्री.पवार, व श्री.तुमाले उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर मुलांना खाऊ देण्यात आला.
शिशु क्रीडांगणाचे उद्घाटन करताना सौ.शोभा भागवत, नगरसेविका सौ.माधुरी सहस्रबुद्धे, पुणे म.न.पा.चे उद्यान अधिकारी व मुले