‘फुलोरा’ नाट्यछटांचा !

दिनांक: ५ ऑगस्ट, २०१५

फुलोरा नाट्यछटांचा या कार्यक्रमात, ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकर यांने बालरंजन केंद्रातील मुले व पालकांशी संवाद साधला. मुलांच्या नाट्यछटा पाहून तो भारावून गेला.

सादरीकरणातील मुलांचा आत्मविश्वास उल्लेखनीय असल्याचे त्याने भाषणात नमूद केले. “ही मुले अतिशय निरागस आहेत. त्यांचं मूलपण असंच जपून ठेवा. त्यांच्यासाठी नाट्यछटा निवडताना त्यांच्या वयाला साजेश्या विषयांवरील नाट्यछटा निवडाव्यात.” असे आवाहन त्याने यावेळी पालकांना केले.

“बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गातील मुले सलग २५ वर्षं नाट्यछटा स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. बक्षिसेही मिळवत आहेत. याखेरीज, त्यांच्या व्यक्तीमत्वात लक्षणीय फरक पडतो” असे निरीक्षण बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी नोंदविले.

प्रज्ञा गोवईकर यांनी सूत्रसंचालन केले, तर दीप्ती कौलगुड यांनी आभारप्रदर्शन केले.

डावीकडून-माधुरी-सहस्रबुद्धे-व-अभिनेता-आरोह-वेलणकर

डावीकडून-माधुरी-सहस्रबुद्धे-व-अभिनेता-आरोह-वेलणकर