दिनांक: ७ ऑक्टोबर, २०१७
नगरसेविका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत, भारती निवास सोसायटीच्या सभागृहात ई वेस्ट व प्लास्टिक वेस्ट कलेक्शन मेगा ड्राईव्ह चे आयोजन केले होते. त्याला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
सायंकाळी ४ ते ७ या तीन तासात १५८५ किलो ई वेस्ट व २५० किलो प्लास्टिक वेस्टचे संकलन झाले.त्यापोटी त्यांना १२० एलईडी ट्यूब लाईट व १२५ एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. दिलेल्या कचर्याच्या बदल्यात मिळालेल्या पर्यावरणपूरक भेटीची अपूर्वाई त्यांना जाणवत होती.
या उपक्रमात पुणे मनपा, श्री रिसायकलर्स , क्लीन गार्बेज व वनराई या संस्थांचे सहकार्य लाभले. यावेळी सौ. सीमा बियाणी यांनी उपस्थितांना एक फिल्म दाखवून “ई कचरासुर व प्लास्टिकासुर ” या दोन दैत्यांवर मात करण्याचे आवाहन केले. नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्व सांगून ४ आर सांगितले . Refuse, Restrict, Reuse, Recycle चे पालन आपण सर्वांनी केले पाहिजे असे नमूद केले. तसेच ठराविक कालावधीने ह्या मोहिमा पुनपुन्हा घेणार असल्याचे माधुरी ताईंनी सांगितले.
यावेळी श्री. बिपीन बियाणी, श्री. ललित राठी, श्री. मुकुंद शिंदे व श्री. दीपक ढेलवान आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभाग १३ मधील स्वच्छता कर्मचार्यांचे याप्रसंगी सत्कार करण्यात आले.
ई वेस्ट कलेक्शन मेगा ड्राईव्ह !
ई वेस्ट कलेक्शन मेगा ड्राईव्ह !