दिनांक: २ ऑक्टोबर, २०१७
आज गांधी जयंतीच्या निमित्ताने बालरंजन केंद्रात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सौ. अंजली तापडिया यांनी यावेळी, गीता परिवार निर्मित ” स्वच्छता ” या विषयावरील एक फिल्म दाखवून मुले व पालकांशी संवाद साधला.अंजलीताई म्हणाल्या ,” गंदगी फैलानेवाले हाथ अनगिनत होते है लेकीन स्वच्छता करनेवाले हाथ बहुत कम है ” असे सांगून त्यांनी मुलांना स्वच्छतेच्या कामी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.”आदते ऐसी होनी चाहिये जो दुसरोंको तकलिफ ना पहुन्चाये” असे त्या म्हणाल्या . सवय ही वयाबरोबर पक्की होत जाते त्यासाठी चांगल्या सवयी बालपणीच लागणे गरजेचे आहे असे त्यांनी पालकांना सांगितले.
बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी मुले व पालकांना ” स्वच्छतेची शपथ ” दिली.ही मुलेच आपल्या प्रभागातील भावी नागरिक आहेत. त्यांना” स्वच्छ भारत अभियानाचे ” महत्व पटले तर आपला प्रभाग भविष्यातही ” सुंदर व हरित ” म्हणून अग्रेसर राहील” असे माधुरीताई म्हणाल्या . उपस्थित सर्वांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात सामील होऊन माधुरीताईंनी दिलेल्या शपथेनुसार वर्तन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
लता दामले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभारप्रदर्शन केले.