दिनांक: १३ जून, २०१७
बालरंजन केंद्राची ताई आशा होनवाड या सुटीत ताडोबा अभयारण्यात सहलीला गेली होती . तिने स्वतः टिपलेली वाघोबाची छायाचित्रे दाखवून मुलांना ताडोबाची सफर घडविली .तीन फुटा वरून बघितलेल्या वाघाची गोष्ट आईक्ण्यात मुले रंगून गेली. ” चंद्रपूर जिल्ह्यातले हे क्रमांक एक चे उद्यान असून तेथे ८५ वाघ आहेत. तेथून ” अंधारी” नावाची नदी वाहते .वाघोबाचे दर्शन घ्यायचे तर खूप शांतता ठेवावी लागते . ” असे सांगून अशा ताईने पिसुरी नावाची छोटी हरणे , सांबर , चितळ , भेकर यांचे फोटो दाखविले . पिसारा फुलवून नाचणारा मोर पहाताना मुले रोमांचित झाली. गवतात लपवलेली शिकार खायला आलेल्या वाघाच्या दबक्या हालचाली त्यांनी पहिल्या. वाघीण आणि तिचे तीन बछडे यांच्यातील प्रेम मुलांनी अनुभवले .
इतका चांगला अनुभव मुलांना दिल्याबद्दल आशाताईचे बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी कौतुक केले. प्रज्ञा गोवईकर यांनी मोगऱ्याचा गजरा देऊन आशाताई चे आभार मानले.