दिनांक: १९ एप्रिल, २०१७
अग्निशमन सप्ताहा निमित्त भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रातील मुले व पालकांनी एरंडवणा अग्निशामक दलाला भेट दिली व प्रात्यक्षिकांचा आनंद लुटला. केंद्र प्रमुख श्री. राजेश जगताप यांनी मुलांना अगदी सोप्या भाषेत माहिती सांगितली. नगरसेविका व बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. मह्दुरी सहस्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ” आग लागली असता किंवा झाड पडले असता अथवा लॅच लागून घरात मूल अडकले असता मुलांनी १०१ क्र. डायल करावा.” असे श्री जगताप यांनी या वेळी सांगितले. अंगावर उडणाऱ्या पाण्याच्या तुषारांनी भिजण्याची मजा घेता घेता, अग्निशामक दलाचे कार्य कसे चालते हे हि मुले शिकली. “रंजनातून शिक्षण हे बालरंजनचे उदिष्ट अशा उपक्रमातून साध्य होते” असे माधुरीताई यावेळी म्हणाल्या.