दिनांक: ११ मे, २०१६
खास सुट्टी निमित्त भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात भातुकलीच्या भांड्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. श्री. विलास करंदीकर यांनी गेली २५ वर्षे जपलेला हा खजिना होता. त्यात मातीची , लाकडाची, दगडाची, तांब्या-पितळ्याची आणि चांदीची हि भांडी ठेवण्यात आली होती. बालरंजनची लहान मुले व त्यांचे पालक, आजी आजोबा तसेच अनेक पुणेकर नागरिकांनी रांग लावून प्रदर्शनाचा आनंद लुटला. पोळपाट लाटणे , खलबत्ता , पाटा वरवंटा हि खेळणी मुलांना हाताळायला ठेवली होती. त्यात मुलांनी पोळ्या लाटल्या , दाण्याचे कूट केले व खोबरे कोथिंबीर वाटून चटणी हि केली. स्वयपाक घरातील या प्रत्यक्ष सहभागामुळे मुले आनंदी झाली. संचालिका सौ. माधुरी सह्स्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.