प्रेरणादायी व्हिडीओज!!

दिनांक: १० एप्रिल, २०१५

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात उन्हाळी सुट्टीच्या पहिल्याच दिवशी मुलांना प्रेरणादायी व्हिडीओजची मेजवानी मिळाली.

सौ.अंजली श्रोत्रिय यांनी जगभरातल्या विविध प्रख्यात मुलांचे व्हिडीओज यावेळी सादर केले. त्यातील छोट्या हसणाऱ्या बाळाबरोबर मुले खदखदा हसली. बॅले डान्सरच्या जादुई प्रात्यक्षिकाने मुले मंत्रमुग्ध झाली. आंतरराष्ट्रीय फुटबालपटू लायोनेल मेस्सीच्या बालपणीच्या खेळाचे व्हिडीयोज पाहून थक्क झाली. कॉम्प्युटरचे अॅप विकसित करणारा बारा वर्षांचा मुलगा, लीलया गणिते सोडविणारा कुत्रा पाहून मुले स्तिमित झाली. शांततेचे नोबेल विजेत्या मलालाचे भाषण हा कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू ठरला.

या साऱ्या व्हिडीयोजना बांधणाऱ्या अंजली श्रोत्रिय यांच्या ओघवत्या निवेदनाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

“मुलांना प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला” असे संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार प्रदर्शनाचे वेळी सांगितले. दीप्ती कौलगुड यांनी प्रास्ताविक केले.

अंजली-श्रोत्रिय-यांच्या-कार्यक्रमात-दंगलेली-बालरंजन-केंद्राची-मुले

अंजली-श्रोत्रिय-यांच्या-कार्यक्रमात-दंगलेली-बालरंजन-केंद्राची-मुले

बालरंजन-केंद्रात-मुलांशी-संवाद-साधताना-अंजली-श्रोत्रिय

बालरंजन-केंद्रात-मुलांशी-संवाद-साधताना-अंजली-श्रोत्रिय