बालरंजन केंद्राची ‘संकल्पपूर्ती’

दिनांक: २८ जुलै, २०१५

दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात, बालरंजन केंद्रात मुलांकडून मदत जमवून, मुलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेला दिली जाते. यावर्षी त्यासाठी ‘एकलव्य बालशिक्षण आणि आरोग्य न्यास’ ह्या संस्थेची निवड करण्यात आली होती. त्याचा ‘संकल्पपूर्ती’ कार्यक्रम आज संपन्न झाला. यानिमित्ताने बालरंजन केंद्रातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी एकलव्य संस्थेला भेट देऊन त्यांच्यासाठी खेळ, गाणी, गोष्टी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बालरंजन केंद्राने जमविलेली रक्कम रु.५५,०००/- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेनुताई गावस्कर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी त्यांनी मुलांना प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या व पालकांना मार्गदर्शन केले.

यु.पी.एस.सी. परीक्षेत महाराष्ट्रात पहिली आलेली अबोली नरवणे, व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत ९३% गुण मिळविणारी मनाली पवळे यांचा यावेळी रेणुताई गावस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

“ह्या विशेष यश मिळविणाऱ्या मुली, बालरंजन केंद्रातील मुलांसाठी खऱ्याखुऱ्या ‘आयडॉल्स’ आहेत” असे मत बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

डावीकडून-अबोली-नरवणे-मनाली-पवळे-रेणूताई-गावस्कर-माधुरी-सहस्रबुद्धे

डावीकडून-अबोली-नरवणे-मनाली-पवळे-रेणूताई-गावस्कर-माधुरी-सहस्रबुद्धे