मुलांनी बनविल्या फिल्म्स!

दिनांक: २९ एप्रिल, २०१५

पुण्यात सुटीत मुलांसाठी अनेक शिबिरे होतात. पण ह्या भाऊगर्दीत आपला वेगळा ठसा उमटविणारे शिबीर होते बालरंजन केंद्राचे फिल्म मेकिंग शिबीर ! १५ दिवसांच्या ह्या शिबिरात मुलांनी एकूण 9 फिल्म्स बनविल्या. श्री.अवधूत नवले व श्री.चिन्मय खराडे यांनी शिबिरात मार्गदर्शन केले. “सब कुछ मुले ” या पद्धतीने लेखन , दिग्दर्शन , कॅमेरा , पार्श्व संगीत , संकलन हि कामे ८ ते १४ वयोगटातील मुलांनी मेहनतीने केली. फिल्म्स चे विषय त्यांच्या अनुभव विश्वातले होते.पाणी , जाणीव ,चोकलेट , कैरी , गुढी पाडवा , नवरूप , प्रेरणा इ . ह्या शिबिराच्या समारोपाला फिल्म्स क्षेत्रातील तज्ञ श्री समर नखाते उपस्थित होते.

‘इतक्या लहान वयात मुलांना हे मध्यम हाताळण्याची संधी मिळत असल्याबद्दल’ त्यांनी समाधान व्यक्त केले. ‘मुलांनी त्यांची संवेदनशीलता जपत, वेगवेगळे विषय त्यांच्या दृष्टीकोनातून मांडले पाहिजेत’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .”प्रत्येक वेळी त्यात संदेश नको पण मुलांना मजा यायला हवी” असे श्री समर नखाते म्हणाले. फिल्म निर्मितीच्या निमित्ताने एकमेकांपासून दूर चाललेली पालक व मुले जवळ येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या शिबिराचाच एक भाग म्हणून श्री.बाळकृष्ण दामले यांच्या सहकार्याने मुलांनी ई.एम.आर.सी. पुणे येथील स्टुडियो ला भेट देऊन फिल्म निर्मितीची प्रक्रिया समजावून घेतली.

मुलांसाठी फिल्म मेकिंगचे पहिलेच शिबीर यशस्वी झाल्याबद्दल बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी समाधान व्यक्त केले. “मोबाईल व डिजिटल कॅमेरा याद्वारे फिल्म्स शूट करताना या उपकरणांशी मुलांची मैत्री झाली , त्यांची भीड चेपली . फिल्म्स च्या सर्व अंगांची ओलाख  तसेच या माध्यमातून आपण काही म्हणू शकतो याचा आत्मविश्वास मुलांना आला हे मोलाचे आहे” असे त्या म्हणाल्या .हे बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाचे २५ वे वर्ष असून यंदा नाटका बरोबर फिल्म्स वरही भर देणार असल्याचे सौ. सहस्रबुद्धे म्हणाल्या. सौ प्रज्ञा गोवइकर यांनी आभार मानले.

मुलांनी बनविल्या फिल्म्स!

डावीकडून-डॉ.चिन्मय-खराडे-अवधूत-नवले-श्री.समर-नखाते-संचालिका-माधुरी-सहस्रबुद्धे

फिल्म-मेकिंग-शिबिराच्या-मुलांची-स्टुडियोला-भेट

फिल्म-मेकिंग-शिबिराच्या-मुलांची-स्टुडियोला-भेट