जागतिक चॉकलेट दिन ! बालरंजन केंद्रात साजरा !

दिनांक: ७ जुलै, २०१७ 

७ जुलै, जागतिक चॉकलेट दिन !

World Chocolate Day ! बालरंजन केंद्रात साजरा ! !

मुलांना चॉकलेट हे अत्यंत प्रिय ! त्यांच्या स्वप्नातही त्यांना, ” असावा सुंदर चॉकलेटचा बंगला ” असे वाटते . म्हणूनच बालरंजन केंद्राने जागतिक चॉकलेट दिन साजरा केला. या दिवसाला मोठा इतिहास आहे. १५५० साली तो पहिल्यांदा साजरा झाला. आजचा ४६६ वा चॉकलेट डे होता. स्पेनमधील बार्सिलोना येथे जगात प्रथम चॉकलेटची निर्मिती झाली. पण आता बेल्जियम मधील चॉकलेटस स्वाद आणि चवीसाठी जगात प्रसिध्द आहेत. अशी माहिती केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी मुलांना दिली. त्यानंतर सर्व मुलांना चॉटलेट्स देण्यात आली. त्याचबरोबर चॉकलेट खाल्यानंतर दात ब्रश करण्याचे महत्व ताईंनी मुलांना सांगितले चॉकलेटच्या चांद्या मुलांनी इकडेतिकडे टाकू नयेत म्हणून त्या गोळाही केल्या. ताईदादांनीही मूल होऊन चॉकलेट खाण्याचा आनंद घेतला.

 

जागतिक चॉकलेट दिन