दिनांक: १८ मे, २०१७
हा कुठलाही मोर्चा नव्हता . ही होती बालरंजन केंद्रातील मुलांनी आपल्या पुण्याचा इतिहास जाणून घ्यायला शनिवारवाद्याला दिलेली भेट .यावेळी केंद्राच्या ६० मुलांनी तेथे नव्याने सुरु करण्यात आलेला दृक-श्राव्य कार्यक्रम पहिला. या शोमध्ये ऐकू येणार्या घोड्यांच्या टापांच्या तसेच रनशिन्गाच्या आवाजाने मुले रोमांचित झाली. कारंज्याच्या तुषारांवर लेझर किरणांद्वारे दिसणारे घोड्यावर बसलेले श्रीमंत बाजीराव पेशवे, मस्तानीचे नृत्य , पेशव्यांच्या काळातला दिमाखदार गणेशोत्सव पाहताना मुले हरखून गेली.पाठ्यपुस्तकात शिकलेला इतिहास प्रत्यक्षात समोर घडताना पाहून त्यांच्या उत्साहाला भरते आले. बाजीराव पेशव्यांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करून मुले घरी परतली.
बालरंजन केंद्राच्या संचालिका व नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.