दिनांक: २२ फेब्रुवारी, २०१७
बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात नाक, घसा, तज्ञ डॉ. सिद्धार्थ यंदे यांनी पालकांना, ‘ घोरणे ‘ – एक सामाजिक समस्या या विषयावर मार्गदर्शन केले. ” झोपेत श्वास घेताना, श्वसनाचा जो आवाज होतो त्याला घोरणे असे म्हणतात. जीभेमागचा श्वसनमार्ग या वेळी आकुंचीत होतो व त्यामुळे घोरणे सुरु होते. आकुंचित श्वसनमार्गा मुळे क्वचित प्रसंगी मृत्यू ही येऊ शकतो. घोरण्याचे प्रमाण दर ४ माणसात १ व्यक्ती असे आहे. त्यामुळे ही समस्या मोठी आहे. घोरणाऱ्या माणसाइतकाच त्रास त्याच्या सहचराला होतो त्यामुळे वैवाहिक जीवनास समस्या होऊ शकते.”
बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, ” डॉ. सिद्धार्थ यंदे हे बालरंजन केंद्राचे माजी विद्यार्थी आहेत. ते नाक, घसा तज्ञ असून त्यांनी इंग्लंड मध्ये जाऊन घोरणे या विषयाचा विशेष अभ्यास केला आहे. केंद्राचे माजी विद्यार्थी तज्ञ बनून पुन्हा केंद्रात मार्गदर्शन करायला येतात याचा विशेष आनंद वाटतो. ”
या वेळी डॉ. यंदे यांनी बालरंजन केंद्राचा विद्यार्थी असतानाच्या आठवणी उपस्थितांना सांगितल्या तसेच सध्या बालरंजन केंद्राचे पालक असल्याचे ही नमूद केले. त्या मुळे कार्यक्रमाला कौटुंबिक स्वरूप आले. प्रेक्षकांनी मनमोकळेपणाने डॉक्टरांवर प्रश्नांची सरबत्ती केली. उमा शहा यांनी आभार प्रदर्शन केले.