पाण्याविना रंगपंचमी 

दिनांक: १७ मार्च, २०१७

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात सन. २०१२ पासून दर वर्षी पाण्याविना रंगपंचमी साजरी केली जाते. कधी साबणाचे फुगे करून तर कधी कापसाच्या म्हाताऱ्या आकाशात उडवून मुलां

संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे मुलांना उपक्रमाचे महत्व विषद करताना

संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे मुलांना उपक्रमाचे महत्व विषद करताना

 

संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे मुलांना उपक्रम समजावून सांगताना

संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे मुलांना उपक्रम समजावून सांगताना

ना आनंद दिला जातो. यंदा मैदानावरील एका भिंतीवर मुलांनी पेंटिंग करून रंगपंचमी साजरी केली. “पाण्यातला रंग खेळून तुम्हाला एक दिवसापुरता आनंद मिळाला असता मात्र तुम्ही केलेले हे रंगीबेरंगी ‘ वाॅल पेंटिंग ‘ पुढची दोन वर्ष बघणार्यांना आनंद देत राहील आणि हे सृजनशील काम आपण केले याचा तुम्हा मुलांना आनंद वाटेल ” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी मुलांना सांगितले. तळ हातावर ब्रशने रंग लावून त्याचा छाप मुलांनी  भिंतीवर उठवला. हाताला वेगवेगळे रंग लावल्याने कधी त्याचे मासे झाले कधी पाने तर कधी फुले ! या निर्मितीचा आनंद मुलांनी घेतला. सीमा अंबिके व दीप्ती कौलगुड यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता.