बालरंजनमध्ये अवतरली ‘पपेटची दुनिया’

दिनांक: ८ डिसेंबर, २०१७

बालरंजन च्या सभागृहात पोपट,ससा,कासव,मांजर,हत्ती पासून ते थेट डायनासोर पर्यंत सगळे प्राणी दाखल झाल्याने मुलांना मोठी मौज वाटली.त्याच्यासह छोटा भीम आणि चुटकी ही पात्रेही होती. सगळ्या मुलांना पपेटस हाताळायलाही मिळाली.

बालरंजन केंद्राच्या ३० व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम म्हणून ४ ते ६ वयोगटातील मुलामुलीन साठी पपेट मेकिंग workshop चे आयोजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले होते.

बालरंजनच्याच पालक सौ. शुभा मराठे, श्रीनिधीची आई, यांनी हे शिबीर घेतले.माधवी केसकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.  

सुरुवातीला शुभाताईंनी फिंगर पपेट व स्टिक पपेट हे प्रकार त्यांना दाखविले.मग ‘ बमबडी बमबम’ हे गाणे म्हणून घेतले. बाहुलीनाट्य सादरीकरणातील महत्वाचा भाग म्हणजे ‘ आवाजातील चढउतार’.

अ आणि ब या दोन गटांची त्यात चढाओढ झाली.सर्व प्राण्यांच्या आवाजात बोलायला मिळाल्याने मुले  खुश झाली.स्वतःच्या हातात घातलेल्या पपेटचे संवाद आयत्या वेळी स्वतःच्या मनाने बोलताना मुलांनी गम्मत उडवून दिली.अतिशय धीटपणे स्टेजवर येऊन पपेटच्या हालचालीही केल्या.

शेवटी त्यांना स्टिक पपेट रंगवायला दिली.ती रंगवून हातात धरून संवाद म्हणतच मुले घरी गेली.  “पपेटचे माध्यम मुलांना भावते. आज शुभा मराठे यांनी , मुलांच्या क्षेत्रातल्या आपल्या अनुभवाच्या आधारे मुलांशी सहज संवाद साधला आणि पालकांनाही मुलांबरोबर पपेटच्या माध्यमातून कसे खेळता येईल याचे उदाहरण घालून दिले.” असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभारप्रदरशन करताना नमूद केले. 

शुभा मराठे मुलांना पपेट दाखविताना

शुभा मराठे मुलांना पपेट दाखविताना

मुलांना पपेट दाखविताना शुभा मराठे

मुलांना पपेट दाखविताना शुभा मराठेपपेट बघताना रंगलेली मुले

पपेट बघताना रंगलेली मुले