दिनांक: १५ ऑक्टोबर, २०१७
मुलांमधल्या कमतरतेलाच त्यांची ताकद बनवा ” असे उद्गार श्री. शंतनू जोशी यांनी काढले. बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात ते बोलत होते.मुलांच्या वर्तन समस्येबद्दल बोलताना ते म्हणाले,” मुले आणि पालक दोघांनी मिळून उत्तरे शोधली तर मुलांना वाढविताना येणाऱ्या निम्म्या समस्या कमी होतील.मुले पालकांचे सतत निरीक्षण करीत असतात. पालकांच्या वागण्यातून मुलांना संदेश मिळत असतात. तुम्हाला मला जे काही सांगायचे असेल तसे मला वागून दाखवा अशी मुलांची अपेक्षा असते .” असे ते म्हणाले.
“पालकत्वातले खाचखळगे पालकांना दाखवून, पालकत्व निभावण्यासाठी सक्षम बनविणे यासाठीच आपण सुजाण पालक मंडळाची स्थापना केली आहे. गेल्या ३० वर्षात या उपक्रमाचा फायदा अनेक पालकांना झाला आहे”.असे बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
सौ. लता दामले यांनी आभारप्रदर्शन केले.