दिनांक: २० जून, २०१७
बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात पर्यावरणावरील विशेष कार्यक्रम घेण्यात आला. ‘स्वच्छतेसाठी इको एन्झाईम’ या विषयावर श्री. किशोर आदमाने यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी लोकसहभागातून यमुना नदीच्या स्वच्छता मोहिमेची माहिती सांगितली. ओल्या कचऱ्या पासून एको एन्झाईम तयार करण्याची सोपी पद्धत त्यांनी सांगितली.
” एका जाडशा प्लास्टिकच्या दोन लिटरच्या बाटलीत एक लिटर पाणी, १०० ग्राम गूळ व ३०० ग्राम ओला कचरा घालून, ते सावलीत ठेवावे. रोज त्यातील gas हलक्या हाताने बाहेर सोडवा. त्यापासून 3 महिन्यात इको एन्झाईम तयार करता येते. ओल्या कचऱ्यात कांदा,बटाटा,लसूण , मुला,आले व हिरवी मिरची घालू नये एवढे पथ्य पाळणे आवश्यक आहे.या एन्झाईमने नापीक जमीन सुपीक होते, नदीतील पाणी स्वच्छ होते.या द्रावाने घरातील काचा ,टोय्लेट , बाथरूम , फरशी याने साफ करता येईल .एन्झाईम वापरून डीटर्जंट चा वापर कमी करता येईल , त्याने नदीचे होणारे प्रदूषण ही कमी होईल .” असे श्री किशोर आदमाने म्हणाले.
“घरच्याघरी आपल्या वाया जाणार्या ओल्या कचर्यापासून इको एन्झाईम तयार करणे व त्याचा वापर करणे ” ही पर्यावरण स्नेही जीवनशैली असल्याचे संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या. प्रज्ञा गोवईकर यांनी आभार मानले. यावेळी श्री.व सौ. सहकारी तसेच श्री. जोशी उपस्थित होते.