इच्छापत्र – एक आवश्यक दस्तावेज – एडवोकेट महामुनी

दिनांक: १७ ऑगस्ट, २०१६

इच्छापत्र करताना घ्यावयाची काळजी याविषयी आड . शिल्पा महामुनी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले . नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ” नागरिकांसाठी मनोरंजनाचे किंवा करमणुकीचे कार्यक्रम करण्याऐवजी एका महत्वाच्या आणि कौटुंबिक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या विषयावर कार्यक्रम घेण्याचे मी ठरवले आणि त्याला आपण इतका चांगला प्रतिसाद दिल्याने आनंद वाटला’असे त्या म्हणाल्या .” .पूर्वी मृत्यू किंवा मृत्युपत्रा बाबत कुटुंबात चर्चा करणे अशुभ समजले जाई . पण आता या विषयाबाबत बराच मोकळेपणा आला आहे . परंतु आधुनिक जीवनशैली , नवनवे आजार व अपघात यामुळे जीवन असुरक्षित वाटायला लागले आहे त्याकरिता इच्छापत्र करणे महत्वाचे आहे . ” असे माधुरी ताई यावेळी म्हणाल्या . 

स्वतःचे शैक्षणिक करिअर उच्च गुणवत्तेचे असलेल्या वकील सौ . शिल्पा महामुनी यांनी हा गंभीर विषय अनेक मराठी कवितांची जोड देऊन , खुलवून प्रेक्षकांना सांगितला . अठराव्या शतकापासून ” मृत्युपत्र ” या विषयाचा आढावा त्यांनी घेतला .अनेक उदाहरणे सांगून व्याख्यान रंजक व उद्बोधक केले . या विषयाकडे केवळ भावनिक दृष्टीने न पहाता थोडे तटस्थतेने आणि व्यावहारिक दृष्टीने गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.आपण स्वकष्टाने मिळविलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची आपल्या पश्चात योग्य विल्हेवाट लावण्यासाठी इच्छापत्र करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले .

कार्यक्रमाच्या अखेरीस मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांन समाधानकारक उत्तरे देऊन नागरिकांचे शंका निरसन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले . भारती सांस्कृतिक मंडळाचे सचिव श्री . अभय पटवर्धन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सौ . लता दामले यांनी आभार प्रदर्शन केले . यावेळी भारती निवास सोसायटीचे सचिव श्री . जयंत आगाशे , श्री . संजय गोखले , श्री बाळासाहेब गांजवे आदि मान्यवर उपस्थित होते .

इच्छापत्र - एक आवश्यक दस्तावेज -अद्व्होकेत महामुनी

इच्छापत्र – एक आवश्यक दस्तावेज -अद्व्होकेत महामुनी

अद्वोकेट-सौ.-शिल्पा-महामुनी

अद्वोकेट-सौ.-शिल्पा-महामुनी

उपस्थित-प्रेक्षकवर्ग

उपस्थित-प्रेक्षकवर्ग