आपले अभयारण्य – शहरातल्या रानव्याची गोष्ट

दिनांक: २४ मे, २०१६

गोष्ट ऐकायला लहान मुलांना खूपच आवडते .ती  जर सचित्र असेल तर मजा येते .आणि ही चित्रे जर पडद्यावर दिसली तर बहारच !

बालरंजन केंद्रातील मुलांनी असाच अनोखा अनुभव घेतला . भारती निवास सोसायटी च्या बालरंजन केंद्रात मृणालिनी वनारसे लिखित ‘ आपले अभयारण्य ‘ या पुस्तकाच्या अभिवाचनाचा प्रयोग रंगला . मृणालिनी व प्रसाद  वनारसे यांनी हे अभिवाचन केले . मधुरा पेंडसे यांनी काढलेली चित्रे पडद्यावर दिसत होती . जोडीला मुलांच्या क्ल्पानाश्क्तीलाही वाव होता . आपल्या घराशेजारीच , आईच्या मदतीने अभयारण्य साकारणारा पिनू  मुलांना भावला .पिनू सारखे आपणही काहीतरी  पर्यावरण रक्षणासाठी करायला हवे असे मुलांना वाटले .

‘ मुलांना निसर्गाशी जोडण्याचे काम या कथेने केले.’ असे प्रतिपादन बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले .’ अभिवाचनातून मुलांचे  श्रवण कौशल्य विकसित होते .आवाजाच्या चढ उतारातून डोळ्यासमोर गोष्टीत घडणाऱ्या घटना उभ्या राहतात .’ हे फार महत्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या . या वेळी डॉ श्यामला वनारसे , सुषमा दातार , शैलजा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते . सीमा अंबिके यांनी प्रास्तविक केले तर माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले .

अभिवाचन-करताना-मृणालिनी-वनारसे

अभिवाचन-करताना-मृणालिनी-वनारसे

अभिवाचन-करताना-मृणालिनी-व-प्रसाद-वनारसे

अभिवाचन-करताना-मृणालिनी-व-प्रसाद-वनारसे