आगळी वेगळी रंगपंचमी

दिनांक: २८ मार्च, २०१६

बालरंजन केंद्रातल्या मुलांनी आज आगळ्या-वेगळ्या पद्धतीनी रंगपंचमी साजरी केली. पाण्याच्या फुग्यांऐवजी साबणाचे फुगे उडवून ते पकडण्याचा खेळ खेळला आणि पाण्याची बचत केली.

तसेच, ह्या दिवसांत तयार होणाऱ्या कापसाच्या ‘म्हाताऱ्या’ उडवून त्या पकडण्याचाही आनंद घेतला. कापसाच्या एकेका बोंडामध्ये निसर्गाने बंदिस्त केलेल्या १०० – १०० म्हाताऱ्या, संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी हाताने मोकळ्या केल्या. निसर्गाची ही किमया पाहून मुले स्तिमित झाली! त्याचवेळी आलेल्या जोरदार वाऱ्याने ह्या म्हाताऱ्या गोल-गोल उडू लागल्या. त्या पकडण्यासाठी मैदानभर मुलांची एकच धांदल उडाली.

कापसाच्या-म्हाताऱ्या-उडविण्यातली-मजा

कापसाच्या-म्हाताऱ्या-उडविण्यातली-मजा

 

साबणाच्या-फुग्यांनी-केली-रंगपंचमी-साजरी

साबणाच्या-फुग्यांनी-केली-रंगपंचमी-साजरी