रोपे तयार करूया

दिनांक: ४ जून, २०१६

बालरंजन केंद्रातील मुलांनी चिंचोके पेरून चिंचेची रोपे तयार केली . भारती निवास सोसायटीच्या मैदानावर चिंचेची भलीमोठी दोन झाडे आहेत. केंद्रातील मुले नेहमी चिंचा तर खातातच . पण नुकतेच मुलांनी प्लास्टिक च्या बाटल्या कापून , बाटलीच्या टोपणाला भोके पाडून वरच्या भागात माती घालून त्यात चिंचोके पेरले . हि तयार झालेली रोपे मुले टेकडीवर जाऊन लावणार आहेत . संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा अंबिके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . मुलांनी वाया गेलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरून पर्यावरण विषयक उपक्रम केला .

रोपे तयार करूया - २

रोपे तयार करूया - ३

रोपे तयार करूया - १