वाद्यांची ओळख – क्रमांक ५ (अपरिचित तालवाद्यांची ओळख)

दिनांक: २१ जून, २०१६

अपरिचित तालवाद्यांची ओळख

श्री अमोल काळे यांनी आज बालरंजन केंद्रातील मुलांना विविध तालवाद्यांची ओळख करून दिली . टाळ , झांज ,मंजिरी आणि चिपळ्या ह्या सगळ्या वाद्यांची एकमेकांशी गट्टी आहे .ही वाद्ये वारकरी किंवा कीर्तनकारा नच्या हाती असतात .घुंगरू , खंजिरी तशी मुलांना माहित असते पण कप्पाश ,दिमडी , चायना बौक्स आणि रेसोरेसो तर अपरिचितच . पोवाड्यात वापरले जाणारा डफ , दांडियाच्या टिपऱ्या , शंकराचा डमरू हि वाद्य मुलांनी ओळखली . दक्षिण भारतातील घटम वाजताना पहिल्यांदाच पाहिला . यानंतर पाळी होती दक्षिण आफ्रिकन जेम्बेची . पाठोपाठ आला बोंगो , कोंगो न तुंबा ! कार्यक्रमाचा शेवट महाराष्ट्राच्या खास ढोलकीने झाला . वाद्यांची ओळख या मालिकेतील हा पाचवा कार्यक्रम होता . ह्यात एकूण २१ वाद्ये श्री काळे यांनी बालगोपालांसमोर सादर केली .

कु . स्वामिनी कुलकर्णी हिने पेटीची साथ केली व गाणीही गायली . तबला साथ श्री . कुलकर्णी यांनी दिली .     ओवी आणि मोहिनी या बालकलाकारानी ‘ पाऊसदादा कधी रे येशील ‘ हे गाणे गायला सुरुवात केली अन बाहेर पाऊस कोसळू लागला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपाली बोरा यांनी केले . संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी अतिशय बहारदार कार्यक्रम सादर केल्याबद्दल श्री . अमोल काळे यांचे आभार मानले .

श्री.अमोल-काळे-डफ-वाजविताना

श्री.अमोल-काळे-डफ-वाजविताना

श्री.अमोल-काळे-घटम-वाजविताना

श्री.अमोल-काळे-घटम-वाजविताना

श्री.अमोल-काळे-रेसो-रेसो-वाजविताना

श्री.अमोल-काळे-रेसो-रेसो-वाजविताना