वाद्यांची ओळख – क्रमांक ३ (तबला)

ओळख तबल्याची

बालरंजन केंद्रात ह्या महिन्यात मुलांना ‘तबला ‘ या वाड्याची ओळख करून देण्यात आली. श्री. भरत जंगम यांनी अतिशय सोप्या भाषेत व गमती जमती करत मुलांना मार्गदर्शन केले. ” तबल्याचे – तबला व डग्गा असे दोन भाग असतात. डग्ग्याला ‘बाया’ असेही म्हणतात. तबल्याचे शाई, चाटी, गजरा, वादी, गठ्ठे असे भाग तर  डग्ग्याचे शाई, चाटी, गजरा, वादी व भांडे असे भाग असतात. दादरा, रूपक आणि आदीकाळम हि तबल्याची काही घड्याळे आहेत. तबला शिकणे हे एखादी भाषा शिकण्यासारखे आहे. ” असे श्री भारत जंगम यांनी मुलांना सांगितले. त्यांनी मुलांना गोष्ठी सांगून त्यातून तबल्याची माहिती दिली.

” यंदा बालरंजन केंद्राची थीम वाद्यांची ओळख हि असून त्याचे हे तिसरे पुष्प असल्याचे संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. जेष्ठ कथक नृत्यगुरू श्रीमती प्रभा मराठे यावेळी उपस्थित होत्या. वर्षा बरिदे यांनी आभार प्रदर्शन केले.

ओळख तबल्याची - श्री. भारत जंगम

ओळख तबल्याची – श्री. भारत जंगम

ओळख तबल्याची - १

ओळख तबल्याची – १

ओळख तबल्याची - २

ओळख तबल्याची – २