दिनांक: ३० नोव्हेंबर, २०१६
बालरंजन केंद्राच्या वाद्यांची ओळख कार्यक्रमात डॉ .राजेंद्र दूरकर यांनी मुलांना एकूण २० वाद्यांची माहिती दिली .” सगळ्यात सोपे वाद्य , जे निसर्गातच बनते ते म्हणजे शंख .ते वाजविण्यास श्वासाची गरज असते .त्यासाठी प्राणायाम करणे आवश्यक आहे ” असे सांगून त्यांनी मुलांना शंख वाजवून दाखवला .त्यानंतर एकतारी , चिपळी , नारळाच्या करवंत्या ,कबास्क ,मराकस ,चकवा अशी विविध वाद्ये मुलांना आईकायला मिळाली .कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रेसोरेसो,खंजिरी , झांजा , स्लेडेन , दिमडी यांनी गम्मत आणली .बगलबच्चा ,मोरसिंग , घुंगरू , मादल , चौडक , ढोल, डफ , चंडा या वाद्यांचा नाद आईकत कार्यक्रम शेवटाकडे आला . हलगीच्या आवाजाने सभागृह दणाणून गेले . त्या तालावर मुले नाचू लागली .
बालरंजन च्या संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या ” डॉ. दूरकर हे स्वतः डॉक्टर असूनही त्यांनी मुलांना ना औषध दिले ,ना इंजेक्शन ! मात्र त्यांनी मुलांना नादरंगाचे टोनिक दिले आहे . त्यामुळे मुले आज खुश झाली आहेत . वाद्यांची ओळख हा कर्यक्रम दर महिन्यात रंगात जाऊन उंची गाठत आहे. त्याला मुले व पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे ”
सौ . किशोरी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले , आशा होनवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभारप्रदर्शन केले .
बालरंजन-केंद्रात-डॉ.-राजेंद्र-दूरकर-नादरंग-सादर-करताना-2