मुले व पालकांनी माध्यम – साक्षर व्हावे !

दिनांक: ९ डिसेंबर, २०१६ 

“आपण सर्वजण साक्षर आहोत. पण आपण ‘माध्यम-साक्षर’ आहोत का?” असा प्रश्न ‘माइंड ब्रिक्स’च्या सौ.वैदेही अष्टपुत्रे – कुलकर्णी यांनी पालकांना विचारला. 

बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात त्या बोलत होत्या. ‘टीव्हीवरील सिरियल्स, बातम्या, जाहिराती यांची एक सांकेतिक भाषा असते. ती आपल्याला समजून घेता आली पाहिजे. चित्र, रंग, संगीत यामुळे जाहिराती आपल्याला खिळवून ठेवतात. त्यांचा आपल्यावर तसेच मुलांवर परिणाम होत असतो. जाहिराती पाहून मुले जंक फूड आणि कोल्डड्रिंक्सचा आग्रह धरतात. अशा अन्नाचे सेवन मेंदूला घातक असते. त्याचा मुलांच्या आरोग्यावर तसेच वर्तनावर परिणाम होत असतो. जाहिरातीत दाखवलेले अन्नपदार्थ प्रत्यक्षात मात्र तितके आकर्षक नसतात. कारण त्यांचे ‘फोटोशूट’ केलेले असते.’ असे त्या म्हणाल्या. “टीव्हीवरील कार्टून सिरियल्स मध्ये दाखवलेली हिंसा पाहून पाहून मुले असंवेदनशील व आक्रमक होतात.” असेही सौ.अष्टपुत्रे यांनी नमूद केले. 

“दैनंदिन जीवनात आपल्यावर माध्यमांचा मारा होत असतो. परंतु, माध्यमातून पाहिलेल्या गोष्टींबद्दल मुलांशी चर्चा केली पाहिजे व त्यांना सकारात्मक सूचना दिल्या पाहिजेत. जाहिरातींच्या जगाला बळी न पडता, सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवून आपले आणि मुलांचे आरोग्य चांगले ठेवले पाहिजे” असे आवाहन पालकांना यावेळी बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले.

सौ.अशा होनवाड यांनी आभार मानले.

वैदेही-अष्टपुत्रे-व-माधुरी-सहस्रबुद्धे

वैदेही-अष्टपुत्रे-व-माधुरी-सहस्रबुद्धे

बालरंजन-केंद्रात-बोलताना-वैदेही-अष्टपुत्रे

बालरंजन-केंद्रात-बोलताना-वैदेही-अष्टपुत्रे

बालरंजन-केंद्रात-मार्गदर्शन-करताना-वैदेही-अष्टपुत्रे

बालरंजन-केंद्रात-मार्गदर्शन-करताना-वैदेही-अष्टपुत्रे