जागतिक मराठी भाषा दिन

दिनांक: २७ फेब्रुवारी, २०१६

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात मराठी भाषा दिनानिमित्त श्री संजय भगत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .श्री . भगत यांनी अतिशय सोप्या भाषेत मुलांशी आणि पालकांशी संवाद साधला .मराठी भाषेतील गमतीजमती त्यांनी मुलांना सांगितल्या . अनेक चपखल उदाहरणे देऊन भाषण रंजक केले .२१ फेब्रुवारी हा दिवस युनो तर्फे जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो तर २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन . त्यामुळे हा आठवडा सर्वत्र भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जातो . २७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक श्री वि . वा . शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे . त्यामुळे हा दिवस अनन्यसाधारण महत्वाचा आहे असे ते म्हणाले .

‘ भारतात मेकॉलेनी इंग्रजी भाषा शिकवायला सुरुवात केल्याला आता १७५ वर्षे लोटली तरी फक्त ५% लोकांना ती  भाषा येते .तरीदेखील समाजाचा रेटा इंग्रजीकडे असल्याने काळजी करावी अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे उलट मराठी भाषेला २००० वर्षांचा इतिहास आहे  हि भाषा समृद्ध आहे , सुबक आहे आणि मोजक्या शब्दात आशय व्यक्त करणारी आहे …”असे ते म्हणाले .

” श्री . भगत हे पुणे म . न . पा . च्या भाषा संवर्धन समितीचे सदस्य  आहेत . स्वतः इंजिनिअर असून त्यांचे मातृभाषे विषयीचे प्रेम विलक्षण आहे आणि त्यापोटी त्यांनी शब्दकोशातील हजारो शब्दांचा डाटाबेस इन्टरनेट वर पदरमोड करून लोकांना उपलब्ध करून दिला आहे .” असे गौरवोद्गार संचालिका व नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी काढले .

ज्योती नूलकर यांनी प्रास्तविक केले तर किशोरी कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.

बालरंजन-केंद्राच्या-कार्यक्रमात-बोलताना-श्री.संजय-भगत-व-संचालिका-सौ.माधुरी-सहस्रबुद्धे

बालरंजन-केंद्राच्या-कार्यक्रमात-बोलताना-श्री.संजय-भगत-व-संचालिका-सौ.माधुरी-सहस्रबुद्धे