घराला मोकळा श्वास घेऊ द्या 

दिनांक: १२ जुलै, २०१६

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात सध्या व्ही – कलेक्ट मोहीम चालू आहे . त्या निमित्ताने संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .त्यांनी मुले व पालकांशी संवाद साधला .’ आजमितीला प्रत्येक घरात एक कपड्याचे , एक चपला-बुटांचे व एक औषधाचे दुकान अस्तित्वात आहे. पण समाधान मात्र नाही .आर्थिक सुस्थिती , एक किंवा दोनच मुले , बाजारात वस्तूंची उपलब्धता आणि माध्यमांचा वाढता प्रभाव तसेच ऑन लाईन खरेदीची सुविधा यामुळे घरे सामानाने ओसंडून वहात आहेत . अशा वेळी आपल्या घरातील मृत – अडगळ ठरलेल्या – वस्तू दुसर्यांच्या घरी जिवंत- उपयुक्त – होऊ शकतात . त्यासाठी वस्तूंमध्ये फार मानसिक गुंतवणूक न ठेवता त्या देऊन टाकाव्यात ‘ असे आवाहन त्यांनी केले .

 ‘  जागेला वस्तू आणि वस्तूला जागा ‘ हे तत्व घर आवरताना लक्षात ठेवले पाहिजे .आपले घर म्हणजे गोडाऊन नव्हे कि आणली वस्तू कि टाक . तिथे आपल्या सोयीचे , आवडीचे आणि अभिरुचीचे मोजकेच समान असावे .केवळ आपल्या जवळच्या वस्तू – गाडी , माडी , साडी – हीच आपली ओळख नव्हे .त्यापलीकडेही जीवन आहे .निसर्गाचे स्रोत मर्यादित असल्याने  तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी निसर्गाचे स्रोत जपूनच वापरले पाहिजेत.असे माधुरीताईनी सांगितले. कमीत कमी गरजा ठेवण्यात जास्तीत जास्त सुख आहे .असेही त्या म्हणाल्या .

आपल्या परिसरातला प्रती चौरस फुटाचा दर अडगळ ठेवायला परवडणारा नाही . त्यामुळे घरातील अडगळ दूर करा म्हणजे आपले घर मोकळा श्वास घेईल .असा विश्वास   सौ . सहस्रबुद्धे यांनी व्यक्त  .

यावेळी ‘ गरज , सोय , चैन ‘ हा खेळ मुले खेळली .त्यातून त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या . किशोरी कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले तर प्रज्ञा गोवईकर यांनी आभार मानले . 

गरज, सोय, चैन हा खेळ मुलांबरोबर खेळताना संचालिका सौ. नाधुरी सहस्रबुद्धे

गरज, सोय, चैन हा खेळ मुलांबरोबर खेळताना संचालिका सौ. नाधुरी सहस्रबुद्धे