How to Handle Peer Pressure?

दिनांक: ८ मार्च, २०१६

बालरंजन केंद्रातील किशोरवयीन मुलांना सौ. माधुरी यादवडकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी खेळ आणि कृतींच्या माध्यमातून या विषयावर उद्बोधन केले.

“पिअर प्रेशर हे नेहमीच वाईट नसते. काही वेळा ते सकारात्मकपणेही काम करते. समवयास्काबरोबर काम करताना मजा येते. नवीन गोष्टी शिकता येतात. पण काही वेळा मित्रांच्या दबावामुळे मुलं अविवेकी धाडस करतात. ते मात्र घातक असते. जेव्हा आपले मित्र एक सांगतात आणि मन वेगळं सांगतं, तेव्हा मुलं संभ्रमात पडतात. मित्र-मैत्रिणी वाईट गोष्टी सहसा गुपचूपपणे सांगतात. अशावेळी आपल्या मनाचे किंवा आई-वडिलांचे ऐकावे. मित्रमंडळीबरोबर असले कि आपल्या मेंदूतील ‘reward center’ सुखावते, आणि आपण कुठलेही धाडस करतो. मित्रांना ‘नाही’ म्हटले कि आपल्याला अपराधी वाटते. म्हणून आपण त्यांना कुठल्याही गोष्टीत साथ देतो. हे टाळण्यासाठी मित्रांना स्पष्टपणे ‘नाही’ म्हणता यायला हवं.” असे सौ.यादवाडकर यांनी यावेळी मुलांना सांगितले.

“किशोरवयात मुलामुलींवर मित्र-मैत्रिणींचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे केलेले धाडस जीवावरही बेतू शकते” असे सांगून संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी पोहता येत नसताना अनोळखी जागी पाण्यात उतरून जीव गमावलेल्या एका मुलाची गोष्ट सांगितली व मुलांना पालकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले.

सौ.राजश्री कुलकर्णी यांनी विडीयो क्लिप्स दाखविल्या तर सौ.आशा होनवाड यांनी आभार मानले.

बालरंजन केंद्राची माजी विद्यार्थिनी कु.ऋतुजा सातपुते हिचा, नुकत्याच केरळ येथे पार पडलेल्या ‘राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सुवर्ण पदक’ पटकावल्याबद्दल संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संचालिका-माधुरी-सहस्रबुद्धे-सायकलपटू-ऋतुजा-सातपुतेचा-सत्कार-करताना

संचालिका-माधुरी-सहस्रबुद्धे-सायकलपटू-ऋतुजा-सातपुतेचा-सत्कार-करताना

डावीकडून-आशा-होनवाड-माधुरी-सहस्रबुद्धे-माधुरी-यादवाडकर-व-राजश्री-कुलकर्णी

डावीकडून-आशा-होनवाड-माधुरी-सहस्रबुद्धे-माधुरी-यादवाडकर-व-राजश्री-कुलकर्णी