‘प्रतिक्रिया नको प्रतिसाद द्या!’

दिनांक: २२ नोव्हेंबर, २०१६ 

‘काही वेळा  मुले हट्टी, दुराग्रही असतात. सार्वजनिक ठिकाणी थयथयाट करतात अशावेळी लोकांसमोर शोभा नको म्हणून पालक मुलांचे म्हणणे मान्य करतात. यातून चुकीचा संदेश मुलांपर्यंत जातो. अशा वेळी पालकांनी स्वतः न चिडता, शांत व ठाम रहावे. मुलांना काहीतरी हवे असते किंवा काहीतरी करायचे नसते यातून आव्हानात्मक वर्तन घडते. अशावेळी मुलांना पालकांनी ‘प्रतिक्रिया’ न देता ‘प्रतिसाद’ द्यावा कारण मुलांचा भावनिक कल्लोळ उडालेला असतो. तेव्हा विषय बदलणे, गाणी, गोष्ट सांगणे, मुलांना जवळ घेणे असे उपाय उपयोगी पडतात.” असा सल्ला समुपदेशिका सौ.प्रतिभा देशपांडे यांनी पालकांना दिला. बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात, ‘मुलांचे आव्हानात्मक वर्तन कसे हाताळाल?’ या विषयावर त्या बोलत होत्या .६ – ७ वर्षांनंतर मुलांना एखादी गोष्ट का हवीय? किंवा का करायचीय ? याची ५ कारणे द्यायची सवय लावा. तीच सवय स्वतः लाही लावून घ्या. आपल्या घरात मोठ्यांना एक न्याय व लहानांना एक न्याय असता कामा नये .”असेही त्या पुढे म्हणाल्या.

“घरातील मोठ्या माणसांनी समंजसपणाचे वर्तन केले तर समरप्रसंगही हसतखेळत निभावता येतात. प्रौढांच्यात एकवाक्यता असेल तर मुले समजूतदार बनतात.” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. मुलांच्या आव्हानात्मक वर्तनाचे विविध किस्से सांगून पालकांनी प्रश्न विचारले. प्रतिभाताईंनी त्यांना समर्पक उत्तरे दिली. ज्योती नूलकर यांनी प्रास्ताविक केले तर सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले .  

माधुरी-सहस्रबुद्धे-व-प्रतिभा-देशपांडे

माधुरी-सहस्रबुद्धे-व-प्रतिभा-देशपांडे

 

उपस्थित-श्रोते

उपस्थित-श्रोते

 

सौ.प्रतिभा-देशपांडे-पालकांशी-संवाद-साधताना

सौ.प्रतिभा-देशपांडे-पालकांशी-संवाद-साधताना