उत्तम अभिनयाने सजलेली बालनाट्ये 

दिनांक: २८ मे, २०१६

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने खास सुट्टीनिमित्त दोन बालनाट्यांचे सादरीकरण केले . ‘ड्रामेबाज’ व ‘सिंहगडाला जेव्हा जाग येते ‘ही दोन नाटके उत्तम अभिनयाने नटलेली होती .दोन्ही नाटकांचे प्रयोग खूपच रंगले . बालरंजन केंद्रातील हे बालकलाकार नवोदित न वाटता कसलेले नट , नटी वाटत होते .उपस्थितांनी नाटकांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली . सिंहगड नाटकातील ‘ पोवाड्याच्या प्रवेशाला ‘ प्रेक्षकांनी वन्स मोअर दिला . पोवाड्याने मुलांना स्फुरण चढले . इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी ह्या उद्देशाने ह्या नाटकाची निवड केली असल्याचे संचालिका सौ माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले . ड्रामेबाज हे नाटक ‘रिअलिटी शो ‘ मागील वास्तव दाखविणारे तसेच पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते असे त्या म्हणाल्या . बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाचे हे २६ वे वर्ष असून आजवर नाट्यवर्गातून सुमारे ६५० मुलेमुली प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत . त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य कलेचा फार उपयोग झाला असल्याचे त्यांनी सांगितले . 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध बासरी वादक श्री . अमर ओक व लेखक -अभिनेता – दिग्दर्शक श्री . प्रवीण तरडे हे उपस्थित होते .अमर ओक यांनी बालरंजन केंद्राच्या ‘ नाट्यवर्ग ‘ उपक्रमाचे कौतुक केले . प्रवीण तरडे यांनी जागरूक पालकांमुळे मुलांना आपले नाट्यगुण दाखविण्याची संधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले . यावेळी नाटकांचे दिग्दर्शक देवेंद्र भिडे , सगीत देणाऱ्या रेणुका भिडे उपस्थित होते .

मुलांचे कौतुक करण्यासाठी रेणूंताई गावस्कर , डॉ . न . म . जोशी , अभिनेत्री वीणा फडके , अनुराधा पंडित , श्री. जयंत व सौ गीता दुवेदी,श्रीमती सुधाताई बोधनी तसेच संगीता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते .   

सिंहगडला जेव्हा जाग येते नाटकातील कलाकार

सिंहगडला जेव्हा जाग येते नाटकातील कलाकार

श्री. अमर ओक यांचा सत्कार करताना संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे

श्री. अमर ओक यांचा सत्कार करताना संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे

बालरंजन केंद्राचे नाटक - ड्रामेबाज

बालरंजन केंद्राचे नाटक – ड्रामेबाज

श्री. प्रवीण तरडे प्रेक्षकांशी संवाद साधतानाश्री. प्रवीण तरडे प्रेक्षकांशी संवाद साधताना

ड्रामेबाज नाटकातील एक प्रसंग

ड्रामेबाज नाटकातील एक प्रसंग