दिनांक: १६ जुलै, २०१६
टाळ्यांच्या गजरात केलेल्या भजनात बालरंजन केंद्रातली मुले दंग झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची विविध भजने मुलांना शिकविण्यात आली.
ग्यानबा तुकारामच्या गजरात मुले मनसोक्त नाचली. यामुळे मुलांच्या शरीराला व्यायाम तर झालाच आणि गजराने मनही प्रसन्न झाले. अमिता नातू, लता दामले, मंजिरी पेठे यांनी सुरेल आवाजात मुलांना भजने सांगितली . केंद्राच्या संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यावेळी उपस्थित होत्या .
१) भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात आषाढी एकादशी निमित्त पाऊल भजनाचा कार्यक्रम आजोजित करण्यात आला होता. मुलांना भजने शिकविताना मंजिरी ताई व माधुरी ताई
२) पाऊल भजनात दंग झालेली मुले